Today Sensex Crashes :आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोमवारी देशांतर्गत शेअर बाजाराची सुरुवात मोठ्या घसरणीसह झाली. सकाळच्या सुमारास बीएसई सेन्सेक्स 475.79 अंकांनी घसरुन 83,094.56 वर व्यवहार करत होता. त्याचप्रमाणे, एनएसई निफ्टीही 138.90 टक्क्यांनी घसरुन 25,555.45 वर बंद झाला. सुरुवातीच्या व्यवहारात निफ्टीमध्ये इंटरग्लोब एव्हिएशन, टेक महिंद्रा, अॅक्सिस बँक, एचयूएल आणि कोटक महिंद्रा बँक हे प्रमुख वाढलेले शेअर्स होते, तर आयसीआयसीआय बँक, टीएमपीव्ही, रिलायन्स इंडस्ट्रीज, सिप्ला आणि एल अँड टी हे घसरलेले शेअर्स होते.
सर्व सेक्टरल इंडेक्स लाल रंगात :
शेअरबजारात आज विक्रीचा दबाव दिसून आला, सर्व सेक्टरल इंडेक्स लाल रंगात व्यवहार करत होते. आयटी, मीडिया आणि रिअल्टी क्षेत्रांमध्ये सुमारे 1% ची घसरण झाली. निफ्टीमध्ये इंटरग्लोब एव्हिएशन, टेक महिंद्रा, अॅक्सिस बँक, एचयूएल आणि बजाज फायनान्स हे प्रमुख वाढले. आयसीआयसीआय बँक, टीएमपीव्ही, रिलायन्स इंडस्ट्रीज, विप्रो आणि मॅक्स हेल्थकेअर हे नुकसानग्रस्त होते.
मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांक कमकुवत :
व्यापक बाजारात, निफ्टी मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकांमध्येही कमकुवतपणा दिसून आला, दोन्ही सुमारे 0.5% घसरले. क्षेत्रीय कामगिरी पाहता, आयटी, मीडिया आणि रिअल्टीसह इतर प्रमुख क्षेत्रांवर दबाव राहिला, ज्यामुळं एकूण बाजारातील भावना कमकुवत झाल्या. गुंतवणूकदार सध्या सावध भूमिका घेत आहेत आणि पुढील संकेतांची वाट पाहत आहेत.
रुपया 12 पैशांनी वाढून 90.66 वर :
सुरुवातीच्या व्यापारात अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया 12 पैशांनी वधारुन 90.66 वर पोहोचला. सोमवारी सुरुवातीच्या व्यापारात प्रमुख परदेशी प्रतिस्पर्ध्यांच्या तुलनेत डॉलर कमकुवत झाल्यामुळं रुपया नीचांकी पातळीवरून 12 पैशांनी वधारुन अमेरिकन डॉलरच्या तुलनेत 90.66 वर पोहोचला. आंतरबँक परकीय चलन विनिमयात, रुपया 90.68 वर उघडला आणि अमेरिकन डॉलरच्या तुलनेत 90.66 वर व्यापार करण्यासाठी पुढं गेला, जो मागील बंदपेक्षा 12 पैशांनी वाढला. मागील दोन सत्रांमध्ये 17 पैशांनी घसरल्यानंतर शुक्रवारी रुपया 44 पैशांनी घसरून 90.78 या त्याच्या नीचांकी पातळीजवळ बंद झाला.











