Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • ताज्या बातम्या
  • १५ वर्षीय विद्यार्थीनीवर व्हिडिओ दाखवत ३ मुलांकडून आळीपाळीने अत्याचार
गुन्हा

१५ वर्षीय विद्यार्थीनीवर व्हिडिओ दाखवत ३ मुलांकडून आळीपाळीने अत्याचार

Student sexually assaulted by 3 boys in turn

Student sexually assaulted by 3 boys in turn : नागपूर मधील नंदनवन पोलीस ठाण्याच्या (Nandanvan Police Station Nagpur) हद्दीत माणुसकीला काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. इयत्ता नववीच्या वर्गात (Student of class IX) शिकणाऱ्या एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर (15-year-old minor girl raped) तिच्याच मैत्रिणीच्या भावाने आणि त्याच्या दोन मित्रांनी सामूहिक अत्याचार आहे. मुख्य आरोपी हा पिडित विद्यार्थीच्या मैत्रिणीचा भाऊ आहे. तो बारावीत शिक्षण घेत आहे. या प्रकरणी पोलिसांनी तातडीने कारवाई करत तीन आरोपींना अटक (Three accused arrested) केली असून, त्यापैकी दोन आरोपी हे अल्पवयीन आहे.

हेही वाचा – पत्नीच्या प्रियकराचा खून; मृतदेह शेजारी बसवून १९१ किमी प्रवास, अन् ७२ तासांत गुन्ह्याचा उलगडा

मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील मुख्य आरोपी हा स्वतः अल्पवयीन असून तो बारावीचा विद्यार्थी आहे. पीडित मुलगी ही मुख्य आरोपीच्या बहिणीच्या वर्गात शिकत असल्याने दोघी चांगल्या मैत्रीणी होत्या. त्यामुळे दोघींच्या एकमेकींच्या घरी अभ्यासाच्या निमित्ताने ये जा होत होती. याच ओळखीचा फायदा घेत आरोपीने तिला अनेकदा भेटण्यासाठी बोलावले होते. मात्र, पीडितेने त्याला वारंवार नकार दिला. असे असतानाही आरोपीने तिला मेसेज करणे सुरूच ठेवले. अखेर ४ फेब्रुवारी रोजी आरोपीने पीडितेशी संवाद साधून तिला आपल्या घरी बोलावले.

आरोपीने मुलीला एका खोलीत नेले आणि तिच्यावर अत्याचार

पीडित मुलगी जेव्हा आरोपीच्या घरी पोहोचली, तेव्हा तिथे आरोपी आणि त्याचे दोन मित्र आधीच उपस्थित होते. मुख्य आरोपीने मुलीला एका खोलीत नेले आणि तिच्यावर अत्याचार केला. धक्कादायक बाब म्हणजे, हे कृत्य घडत असताना बाहेर असलेल्या त्याच्या दोन मित्रांनी या संपूर्ण प्रकाराचा व्हिडिओ मोबाईलमध्ये कैद केला. यानंतर, हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत इतर दोन आरोपींनीही पीडितेवर आळीपाळीने अत्याचार केला.

व्हिडिओ दाखवून ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला

या घटनेनंतर आरोपींनी पुन्हा एकदा पीडितेला तो व्हिडिओ दाखवून ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला आणि तिला पुन्हा भेटायला बोलावले. मात्र, या जाचाला कंटाळून आणि प्रचंड घाबरलेल्या अवस्थेत असलेल्या पीडितेने अखेर धाडस दाखवून आपल्या कुटुंबाला आपबिती सांगितली. त्यानंतर नंदनवन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने तिन्ही आरोपींना ताब्यात घेतले आहे. त्यांच्यावर पोक्सो (POCSO) कायद्यांतर्गत आणि बलात्काराचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

img

Prakash

Web Content Producer

प्रकाश हराळे हे परखड, निर्भीड आणि निःपक्षपाती पत्रकार आहेत. सध्या ते LS मराठी येथे 'डिजिटल कंटेंट प्रोड्युसर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हराळे यांना दैनिक राष्ट्रसंचार, एज्युवार्ता न्यूज पोर्टल वृत्तसंस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हे जवळपास ५ वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी पुण्यातील "मराठवाडा मित्र मंडळ" या नामांकित महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवीत्तर पदवीचे शिक्षण घेतलं आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखन आणि सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याची आवड आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts