आंध्र प्रदेशातील अंबेडकर कोनसीमा जिल्ह्यातील या प्रकरणाने संपूर्ण परिसर हादरला आहे. २२ वर्षीय ओलेटी पुष्पा ही तरुणी तिच्या लिव्ह-इन पार्टनर शेख शम्मासोबत गेल्या सहा महिन्यांपासून एकत्र राहत होती. या काळात शम्मा सतत तिच्यावर वेश्याव्यवसायात उतरावं यासाठी दबाव टाकत होता. मात्र पुष्पाने वारंवार याला विरोध केला.
या सततच्या दबावामुळे दोघांमध्ये वारंवार वाद होत होते. बुधवारी रात्री पुन्हा एकदा याच कारणावरून मोठा वाद झाला. या वादात संतापलेल्या शम्माने पुष्पाची हत्या केली. घटनेनंतर शेख शम्मा फरार झाला होता, परंतु स्थानिक पोलिसांनी काही तासांतच त्याला अटक केली आहे.
पोलिसांचे म्हणणे आहे की आरोपी मानसिकरित्या दबावाखाली होता आणि त्याला वाटत होते की पुष्पा त्याच्याशी विश्वासघात करत आहे. त्यामुळे त्याने संशय, संताप आणि अस्वस्थतेच्या भरात हे टोकाचं पाऊल उचललं.
या प्रकरणामुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. वेशवृत्ती नाकारल्यामुळे महिलेला आपला जीव गमवावा लागतो, ही अत्यंत दुःखद बाब आहे.
स्थानीय लोकांची प्रतिक्रिया:
स्थानिक नागरिकांनी या घटनेनंतर तीव्र संताप व्यक्त केला असून, आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी केली आहे. काही सामाजिक कार्यकर्त्यांनी या प्रकरणात सरकारने लक्ष घालावं, अशीही मागणी केली आहे.