electrocution during borewell motor removal : धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील केशेगाव शिवारात बोअरमधील मोटार काढण्याचे काम सुरू असताना कप्पीचा महावितरणच्या जिवंत विद्युत तारेस स्पर्श झाल्याने दोन पितापुत्रांसह चार जणांचा तीव्र विद्युत धक्क्याने जागीच मृत्यू झाला.
केशेगाव येथील शेतकरी गणपती साखरे यांच्या शेतातील बोअरमधून मोटार बाहेर काढण्यासाठी कप्पीच्या सहाय्याने काम सुरू होते.याच दरम्यान कप्पीचा अचानक महावितरणच्या जिवंत विद्युत तारेस स्पर्श झाला आणि काम करणारे सर्वजण विजेच्या प्रवाहाच्या कचाट्यात सापडले.
हे ही वाचा : सोलापूरात तृतीयपंथी इच्छुक उमेदवाराची हत्या, तीन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना बेड्या
मृतांची नावे आली समोर
मृतांमध्ये काशिम फुलारी व त्यांचा मुलगा रतन फुलारी, तसेच नागनाथ साखरे व त्यांचा मुलगा रामलिंग साखरे अशा दोन पितापुत्रांचा समावेश आहे. या दुर्दैवी घटनेत मृत पावलेल्या व्यक्तींची नावे समोर आली आहे. काशिम कोंडीबा फुलारी (वय ५४), रतन काशिम फुलारी (वय १६) तर नागनाथ काशिनाथ साखरे (वय ५५) रामलिंग नागनाथ साखरे (वय ३१) असे मृत व्यक्तीचे नावं आहे. हे सर्व तुळजापूर तालुक्यातील केशेगाव येथील रहिवाशी असल्याची माहिती समोर आली आहे.






