गडचिरोली-छत्तीसगड सीमेवरील कोपर्षी जंगलात पोलिस व नक्षलवाद्यांमध्ये तब्बल आठ तास चकमक झाली. या मोहिमेत गडचिरोली पोलिसांना मोठे यश मिळाले असून तीन महिला व एक पुरुष अशा चार नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला. घटनास्थळावर एसएलआर, दोन इंसास व एक 303 रायफल जप्त करण्यात आली. मुसळधार पावसाच्या कठीण परिस्थितीत चाललेल्या या कारवाईनंतर परिसरात नक्षलविरोधी अभियान अधिक तीव्र करण्यात आले आहे.












