अकोला : ऐन सणासुदीच्या काळात सोने चांदीच्या भावाने उच्चांक गाठला आहे. यामुळे सोने खरेदी करणे सर्वसामान्य नागरिकांना न परवडणारे आहे. त्यामुळे सोन्याचा दागिना हा मौल्यवान बनला आहे. असे असताना सोने चोरी, फसवणूक, घरफोडी, चैन स्नॅचिंग यासारख्या घटना वाढताना दिसत आहे. अशीच एक सोन्याचे आमिष दाखवून गंडवल्याची घटना समोर आली आहे.
अकोला येथे कमी भावात सोने खरेदी करून देतो म्हणत एका महिलेला 1 कोटी 11 लाख रुपयांचा गंडा लावल्याचा प्रकार समोर आलाय. याप्रकरणी पोलिसांनी याप्रकरणी पोलिसांनी अमोल नेरकर, मनोहर नेरकर, प्रेम हरि नारायण गावंडे आणि नीतेश महल्ले या चार आरोपींना अटक केली आहे. आणि त्यांच्याकडे असलेले दागिनेही जप्त करण्यात आले आहे.
या महिलेला कमी दारात सोने खरेदी करून देतो म्हणत महिलेकडून 1 कोटी 11 लाख रुपये मागण्यात आले. त्यानंतर महिलेला विश्वास संपादन करण्यासाठी असली सोने देण्यात आले. मात्र त्यानंतर महिलेला नकली सोने देण्यात आले. सोने नकली असल्याचे या महिलेला कळताच महिलेने जवळील रामदासपेठ पोलीस स्टेशन मध्ये धाव घेत तक्रार नोंदवली. त्यानंतर पोलिसांनी चौघांना अटक केली.
यावेळी पोलिसांनी आरोपींकडून 514.720 ग्रॅम वजनाचे सुमारे 61 लाख 76 हजार रुपये इतकी किंमत असलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहे. तर आरोपींनी महिलेकडून मिळालेल्या पैशातून असली सोने खरेदी करून ते अकोला , तेल्हारा, नांदुरा, खामगाव आणि बुलढाणा येथील ज्वेलर्सकडे गहाण ठेवल्याचोई माहिती मिळाली.