नांदेडच्या डी मार्टजवळील स्पा सेंटरवर भाग्यनगर पोलिसांनी धाड टाकत अनैतिक व्यवसायाचा पर्दाफाश केला आहे. स्थानिकांनी वारंवार तक्रारी केल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली. तपासात समोर आलं की, आसामसह इतर राज्यांतून मुलींना इथे आणलं जात होतं. या स्पा सेंटरचा नेमका मालक कोण? याचा शोध सध्या पोलीस घेत आहेत. या प्रकरणामागे मोठं रॅकेट कार्यरत असल्याचा संशय व्यक्त होत असून, स्थानिक नागरिकांनी संपूर्ण टोळीवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. घराजवळच सुरू असलेल्या अशा घाणेरड्या धंद्यामुळे नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण आहे. प्रशासनाच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित होतोय.
(trending )












