Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
Top News

महागाई आणि गॅस टंचाईमुळे नवरा-बायकोच्या नात्यात तणाव निर्माण

Inflation and Gas Shortage Impact

Inflation and Gas Shortage Impact : आखाती देशांतील युद्धाचा परिणाम आता थेट आपल्या घरगुती आयुष्यावरही होताना दिसतोय. महागाई आणि गॅस टंचाईमुळे (Inflation and Gas Shortage) नवरा-बायकोच्या नात्यात तणाव (Tension between husband and wife) निर्माण झाल्याची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या वादातून पत्नी थेट माहेरी निघून गेल्याची घटना उत्तर प्रदेशात घडली आहे.

हेही वाचा – ‘कॅप्टन खरात’ प्रकरण तापलं, महिला सुरक्षिततेचा गंभीर मुद्दा

गॅसमुळे नवरा बायकोत जोरदार भांडण

उत्तर प्रदेशच्या रबूपुरा भागात राहणाऱ्या एका कुटुंबामध्ये गेल्या काही दिवसांपासून गॅस सिलेंडर संपलेला होता. पत्नीने अनेक वेळा नवऱ्याला नवीन सिलेंडर आणण्याची विनंती केली. मात्र, वारंवार सांगूनही नवऱ्याने याकडे दुर्लक्ष केल्याने दोघांमध्ये जोरदार वाद झाला. या वादानंतर पत्नीने थेट माहेरी जाण्याचा निर्णय घेतला. जोपर्यंत घरात गॅस सिलेंडर येत नाही, तोपर्यंत मी परत येणार नाही असा इशाराही तिने दिला आहे.

गॅस बुकिंगमधील अडचणी याला जबाबदार

उत्तर प्रदेशातील ही घटना सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. केवळ गॅस सिलेंडरसारख्या मुद्द्यावरून एखादी महिला आपलं घर सोडू शकते का? असा प्रश्न अनेकांना पडू लागला आहे. काही जण वाढती महागाई, तर काही जण गॅस बुकिंगमधील अडचणी याला जबाबदार धरत आहेत. सध्या सिलेंडरच्या उपलब्धतेत होणारा उशीर हा देखील नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे.

लहानशी समस्या कौटुंबिक वादाला कारणीभूत

या प्रकरणात सिलेंडर मिळण्यात झालेला उशीर हा नवऱ्याच्या निष्काळजीपणामुळे झाला की गॅस एजन्सीच्या तांत्रिक अडचणीमुळे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, या घटनेतून एक गोष्ट स्पष्ट होते की घरातील लहानशी समस्या देखील मोठ्या कौटुंबिक वादाला कारणीभूत ठरू शकते.

img

Prakash

Web Content Producer

प्रकाश हराळे हे परखड, निर्भीड आणि निःपक्षपाती पत्रकार आहेत. सध्या ते LS मराठी येथे 'डिजिटल कंटेंट प्रोड्युसर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हराळे यांना दैनिक राष्ट्रसंचार, एज्युवार्ता न्यूज पोर्टल वृत्तसंस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हे जवळपास ५ वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी पुण्यातील "मराठवाडा मित्र मंडळ" या नामांकित महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवीत्तर पदवीचे शिक्षण घेतलं आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखन आणि सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याची आवड आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts