जालन्याच्या घनसावंगी तालुक्यातील बोधलापुरी गावात जागेच्या जुन्या वादामुळे एक तरुण मृत्यूमुखी पडला आहे. 26 वर्षीय संभाजी उंडे या तरुणाचा आज सकाळी धारदार शस्त्राने पोटात वार करून खून करण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला असून, शवविच्छेदनासाठी मृतदेह घनसावंगी सामान्य रुग्णालयात हलवण्यात आला आहे. या घटनेमुळे गावात खळबळ उडाली असून, संबंधित आरोपीच्या विरोधात कायदेशीर कारवाई सुरू आहे.












