मध्य प्रदेशातील बुरहानपुर जिल्ह्यातील नावरा गावात प्रेमप्रकरणातून धर्मांतरणाचा दबाव नाकारल्याने एका ३५ वर्षीय युवतीची निर्घृण हत्या करण्यात आली. आरोपी शेख रईसने भव्याश्री नामदेव धनुक हिचा चाकूने गळा चिरून खून केला. पीडितेच्या बहिणीने सांगितलं की, रईस तिला इस्लाम स्वीकारून निकाह करण्यासाठी जबरदस्ती करत होता. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याच्यावर हत्या आणि SC/ST अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे गावात तीव्र संताप पसरला असून ग्रामस्थांनी बंद व निषेध आंदोलन छेडलं आहे. प्रशासनाने आरोपीच्या अवैध मालमत्तेवर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. प्रकरणाचा तपास सुरू आहे.












