जालना शहरातील भक्तेश्वरनगर येथे काल रात्री गस्त घालत असताना, गोपनीय माहितीच्या आधारे करण किसन लांडगे नावाच्या व्यक्तीला ताब्यात घेऊन झडती घेण्यात आली. त्याच्याकडून 1 पिस्तूल, 2 मॅगझिन आणि एक पिवळ्या धातूची पिस्तूल जप्त करण्यात आली. या आरोपीविरुद्ध तालुका जालना पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही माहिती स्थानिक गुन्हे पथकाचे प्रमुख पंकज जाधव यांनी दिली आहे.












