Pune ED car scam : पुण्यात ईडी ने मोठी कारवाई केल्याची माहिती समोर आली आहे. ED कडून फक्त एक किंवा दोन नाही तर तब्बल 12 ठिकाणी धाड टाकण्यात आल्याची माहिती समोर आली असून अनेक प्रकरणे समोर आले आहेत.
पुण्यातील विद्यापीठ रोडवर असलेल्या SBI स्टेट बँक ऑफ इंडिया च्या शाखेत 19.38 कोटी रुपयांची लक्झरी कार कर्ज घोटाळा याप्रकरणी ED अंमलबजावणी संचलनालयाने छापेमारी केली आहे. या प्रकरणी अनेक बाबी समोर आल्या असून ही पुण्यातील सर्वात मोठी छापेमारी असल्याचे सांगण्यात येत आहे. या कारवाईदरम्यान ईडीने बनावट कागदपत्रांचा वापर करत फसवणूक केलेल्या कर्जाच्या पैशातून लक्झरी कार खरेदी करण्यात आल्या आहे. या छापेमारी दरम्यान अनेक उच्च दर्जाच्या लक्झरी कार जप्त करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यात शिवाजीनगर पोलिसस्टेशन मध्ये दाखल करण्यात आलेल्या FIR च्या आधारे आणि CBI ACB यांच्या माध्यमातून ही कारवाई करण्यात आली. मंगळवारी आणि बुधवारच्या दरम्यान ED कडून पुण्यातील १२ निवासी आणि व्यावसायिक जागांवर ही छापेमारी करण्यात आली.
हे ही वाचा : दुर्दैवी अपघात! कारवर भरधाव डंपर पलटला, अंत्यसंस्काराला जाणाऱ्या एकाच कुटुंबातील सात जणांचा जागीच मृत्यू
या कारवाई दरम्यान 2017–2019 या वर्षात विद्यापीठ रोडवर असलेल्या एसबीआय बँक शाखेत काम करणाऱ्या चीफ मॅनेजर असलेल्या अमर कुलकर्णी यांनी ऑटो लोन काउन्सलर आदित्य सेठिया आणि काही निवडक कर्जदारांसोबत कटकारस्थान करून बँकेची फसवणूक केल्याची माहिती समोर आली. यावेळी जमा करण्यात आलेलेल कागदपत्रे हे बनावट होते. आणि याच कागदपत्रावर महागडे कार लोनला मंजूरी देण्यात आल्याचे आरोप लगावण्यात आले होते.
ईडीकडून मिळालेल्या माहितीनुसार, बनावट दस्तऐवजांचा वापर करून अनेक आरोपींनी आलिशान कार घेण्यासाठी कर्ज घेत बँकेची कोट्यवधींची फसवणूक केली होती. या बँकेत बनावट आणि वाढीव रकमेची कोटेशन्स सादर करण्यात आले होते, यामुळे
लोनची रक्कम जास्त दर्शवून कर्ज मंजुरी मिळू शकेल. परंतु हा घोटाळा आता उघड झाला आहे. . या कर्ज घोटाळ्यामध्ये बीएमडब्लू, वोल्वो, मर्सिडीज, रेंज रोव्हर अशा अनेक गाड्यांची खरेदी करण्यात आल्याची माहिती मिळाली












