पुणे : गेल्या काही दिवसापासून पुण्यात गुन्हेगारीचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. काही दिवसापूर्वी पुण्यातील आयुष कोमकर नावाच्या मुलाचा खून करण्यात आला होता. या घटनेला काही महिने उलटताच आणखी एक खून झाल्याची घटना समोर आली आहे. एका मुलाने किरकोळ वादातून वडिलांचा खून केला आहे. या घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे.
पुण्यातील कोथरूड भागातील जय भवानी नगर येथील 2 नंबर चाळीत राहणाऱ्या मुलाने टीव्ही बंद करण्याच्या वादातून बापाचा खून केला आहे. सचिन पायगुडे असे या आरोपी मुलाचे नाव असून तानाजी पायगुडे असे मृत वडिलांचे नाव आहे. याप्रकरणी कोथरूड पोलिसांनी आरोपी सचिन पायगुडे याला ताब्यात घेतले असून या मुलाच्या आईनेच याप्रकरणी पोलिसांमध्ये तक्रार केली होती.
आज दुपारी 12 वाजेच्या सुमारास आरोपी सचिन हा माळ्यावर टीव्ही बघत होता. त्याचवेळी त्याच्या वडिलांनी टीव्ही बंद कर आणि माझ्या डोळ्यात ड्रॉप टाक असं सांगितले. यामुळे बाप लेकांमध्ये वाद झाला आणि रागाच्या भरात आरोपी सचिन ने वडिलांवर स्वयपाकघरातुन चाकून आणून वडिलांच्या गेल्यावर आणि तोंडावर वार केले. यामुळे गंभीर जखमी झालेल्या तानाजीचा जागीच मृत्यूची झाला.
याप्रकरणी कोथरूड पोलिसांनी घटनास्थळी दाखल झाल्यानंतर मुलाला ताब्यात घेतले. त्याच्यावर आई ने दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस याबाबत तपास करत आहे.