धुळे एलसीबी आणि नरडाणा पोलिसांनी संयुक्त कारवाईत मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर खाद्य तेलाच्या टॅंकरमधून गुजरातकडे नेत असलेली तब्बल ₹56 लाखांची अवैध दारू जप्त केली. टॅंकरमध्ये सहा गुप्त कप्पे तयार करून दारूचे बॉक्स लपविण्यात आले होते. टॅंकरसह एकूण ₹1 कोटींचा मुद्देमाल जप्त झाला असून या कारवाईमुळे महाराष्ट्र-गुजरात सीमेवरील तस्करी नेटवर्कला मोठा धक्का बसला आहे.












