दहीहंडीचा जल्लोष शिगेला पोहोचलेला असतानाच शिर्डी शहरातील दहीहंडी मिरवणुकीनंतर जुन्या वादातून सानूकुमार ठाकूर या तरुणाची चाकूने वार करून निर्घृण हत्या करण्यात आली. काही तासांपूर्वी जल्लोषात सामील असलेलं हे शहर अचानक शोकाकुल झालं. घटनेनंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत साई कुमावत आणि शुभम गायकवाड या दोघांना अटक केली आहे. मयताचे वडील नवीनकुमार बालबोध ठाकूर यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.












