Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • ताज्या बातम्या
  • बीडमध्ये धक्कादायक घटना, वसतिगृह चालकाकडून १ हजार थकीत शुल्कासाठी विद्यार्थ्याला अमानुष मारहाण
Top News

बीडमध्ये धक्कादायक घटना, वसतिगृह चालकाकडून १ हजार थकीत शुल्कासाठी विद्यार्थ्याला अमानुष मारहाण

Student Brutally Beaten

Student Brutally Beaten : एका विवाहितेला घरातून उचलून नेल्याची आणि मुलीवर सामुहिक बलात्काराची घटना ताजी असतानाच बीडच्या गेवराईतून एक धक्कादायक घटना समोर आलीय. गुन्हेगारीमुळे नावारूपाले आलेले बीड (Beed Crime News) पुन्हा एकदा विद्यार्थ्याला केलेल्या अमानुष मारहाणीमुळे (Student Brutally Beaten) चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहे. बीडच्या गेवराईमध्ये एका विद्यार्थ्याला वसतिगृह चालकाने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली. थकीत एक हजार रुपयांच्या शुल्कासाठी प्रवीण जाधव या विद्यार्थ्याला ( Student Pravin Jadhav) ही अमानुष मारहाण करण्यात आली. या मारहाणीच्या घटनेची पोलिसांनी गंभीर दखल घेत वसतिगृह चालकावर गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, गेवराई तालुक्यातील मारफळा तांडा येथील ऊसतोड मजूर बाळू जाधव यांचा मुलगा प्रवीण गेवराईतील सूर्योदय निवासी वस्तीगृहात राहून शिक्षण घेत आहे. बाळू जाधव यांनी चालू वर्ष वसतिगृहाच्या ४० हजार शुल्कापैकी ३९ हजार रुपये शुल्क भरले. मात्र, उर्वरित राहिलेल्या केवळ एक हजार रुपये शुल्कामुळे वसतीगृह चालक सुरेश राठोड तगादा लावत होता.

पालक वसतिगृह शुल्क वेळेवर भरत नसल्याने वसतिगृह चालक सुरेश राठोड याने विद्यार्थ्याला शिवीगाळ करत बेदम मारहाण केली. या प्रकारानंतर संतप्त पालकांच्या तक्रारीवरून सुरेश राठोड विरोधात गेवराई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. एका विद्यार्थ्याला झालेल्या मारहाणीच्या घटनेमुळे पालकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेमुळे बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमी कधी संपणार? आणि गुन्हेगारांमध्ये पोलिसांचा धार राहिला नाही का? असे प्रश्न पुन्हा एकदा या घटनेमुळे समोर आले आहेत.

 

 

img

Prakash

Web Content Producer

प्रकाश हराळे हे परखड, निर्भीड आणि निःपक्षपाती पत्रकार आहेत. सध्या ते LS मराठी येथे 'डिजिटल कंटेंट प्रोड्युसर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हराळे यांना दैनिक राष्ट्रसंचार, एज्युवार्ता न्यूज पोर्टल वृत्तसंस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हे जवळपास ५ वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी पुण्यातील "मराठवाडा मित्र मंडळ" या नामांकित महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवीत्तर पदवीचे शिक्षण घेतलं आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखन आणि सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याची आवड आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts