उल्हासनगरमधील साईबाबा मंदिर परिसरात एक धक्कादायक खून घडला आहे. किरकोळ कारणावरून साजीद शेख या तरुणाला १० ते १५ जणांच्या टोळक्याने धारदार शस्त्राने हल्ला केला. या घटनेचा व्हिडिओ सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून, पोलिसांनी तात्काळ दोन आरोपींना अटक केली आहे. घटनास्थळी तणाव वाढल्याने अधिक तपास सुरू आहे.












