बीड जिल्ह्याच्या स्थानिक गुन्हे शाखा आणि नेकनूर पोलिसांनी 4 किलो गांजा पकडल्याची माहिती मिळाली आहे. स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांनी अवैद्य धंद्यावर कारवाई करण्याचे आदेश त्यांच्या टीमला दिले होते. त्यानंतर पेट्रोलिंग करत असताना गोपनिय माहीती प्राप्त झाली. त्यानंतर पांढऱ्या रंगाची इंडिगो गाडीमधील अवैध्य गांजा पोलिसांनी पकडला.












