वसमत शहरात ग्रामीण पोलीस स्टेशन समोर कामावरून परत जाणाऱ्या 60 वर्षीय इसमाचा अज्ञात वाहनाच्या धडकेने मृत्यु झाला आहे. रामेश्वर विठ्ठल तपासे असे या व्यक्तीचे नाव आहे. पोलिसांनी अज्ञात वाहकासह चालकाचाशोध लावून तत्काळ गुन्हा दाखल करावा असे त्यांच्या फॅमिलीकडून सांगण्यात येत आहे.












