Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • ताज्या बातम्या
  • दोन्ही हात नसलेला विद्यार्थी देतोय बारावीची परीक्षा, पायाच्या बोटांमध्ये पेन धरून लिहतोय पेपर
ताज्या बातम्या

दोन्ही हात नसलेला विद्यार्थी देतोय बारावीची परीक्षा, पायाच्या बोटांमध्ये पेन धरून लिहतोय पेपर

Writing paper with pen between toes

Writing paper with pen between toes : सध्या राज्यात उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत (Board of Higher Secondary Education) इयत्ता बारावीच्या परीक्षा (Class 12th Board Exam) घेतल्या जात आहेत. या परीक्षेदरम्यान एक कौतूकास्पद घटना पाहायला मिळाली. जिद्द आणि चिकाटी असेल तर कोणतीही अडचण आड येत नाही याचे जिवंत उदाहरण नांदेड जिल्ह्यात पाहायला मिळत आहे. जन्म झाल्यापासून दोन्ही हात नसतानाही एका विद्यार्थ्याने हार न मानता पायाच्या बोटांनी बारावीची परीक्षा (A disabled student is appearing for the 12th standard exam) देत सर्वांना प्रेरणा दिली आहे. नांदेड जिल्ह्यातील कंधार येथील शिवाजी कॉलेजमध्ये (Shivaji College Kandahar) शिकणारा सुरज शिवराज उबाळे हा विद्यार्थी (Suraj Shivraj Ubale is a student) सध्या बारावीची परीक्षा देत आहे. त्याच्या या चिद्दीमुळे सर्वत्र कौतूकाचा वर्षाव होत आहे.

हेही वाचा – कांद्याने शेतकऱ्याला रडवले, कवडीमोल भावामुळे शेतकऱ्याने फिरवले उभ्या कांद्यावर रोटावेटर

सुरज हा नांदेड शहराजवळील गाडेगाव गावचा रहिवासी आहे. जन्मतःच दोन्ही हात नसल्यामुळे त्याला दैनंदिन कामांसाठीही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. मात्र, लहानपणापासूनच त्याने परिस्थितीशी दोन हात करत पायाच्या बोटांनी लिहिण्याचा सराव केला. शालेय जीवनातही सुरजने पायानेच लेखन करत शिक्षण पूर्ण केले. आता बारावीच्या महत्त्वाच्या टप्प्यावरही त्याने कोणतीही विशेष सवलत न मागता स्वतःच्या पायाने उत्तरपत्रिका लिहिण्याचा निर्णय घेतला आहे.

पायाच्या बोटांमध्ये पेन धरून पेपर लिहिताना दिसत आहे

परीक्षा केंद्रावर तो आत्मविश्वासाने पायाच्या बोटांमध्ये पेन धरून पेपर लिहिताना दिसत आहे. सुरजच्या या जिद्दीचे शिक्षक, मित्रपरिवार आणि जिल्हाभरातून कौतुक केले जात आहे. त्याच्या धैर्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळत आहे. भविष्यात उच्च शिक्षण घेऊन शिक्षक बनण्याचे त्याचे स्वप्न आहे. माझ्यासारख्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करायचे आहे आणि शिक्षणाच्या माध्यमातून समाजासाठी काहीतरी करायचे आहे, असे त्याने म्हटले आहे.

img

Prakash

Web Content Producer

प्रकाश हराळे हे परखड, निर्भीड आणि निःपक्षपाती पत्रकार आहेत. सध्या ते LS मराठी येथे 'डिजिटल कंटेंट प्रोड्युसर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हराळे यांना दैनिक राष्ट्रसंचार, एज्युवार्ता न्यूज पोर्टल वृत्तसंस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हे जवळपास ५ वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी पुण्यातील "मराठवाडा मित्र मंडळ" या नामांकित महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवीत्तर पदवीचे शिक्षण घेतलं आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखन आणि सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याची आवड आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts