अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा फाटा येथे मध्यरात्री मयूर रासने यांच्या कालिका फर्निचर दुकानाला लागलेल्या भीषण आगीत वरच्या मजल्यावर झोपलेल्या रासने कुटुंबातील चौघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मृतांमध्ये मयूर रासने, पत्नी पायल, मुलगा अंश व धाकटा मुलगा चैतन्य यांचा समावेश आहे. 25 वर्षीय यश रासने व एका 70 वर्षीय महिलेची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.












