फक्त एका ट्रेडिंग सत्रात अमेरिकन शेअर बाजारात तब्बल 1 ट्रिलियन डॉलरची घसरण झाली. भारतावर लादलेले नवे टॅरिफ, Amazon चे खराब आर्थिक निकाल आणि कमजोर रोजगार आकडे यामुळे बाजारात मोठा गोंधळ निर्माण झाला. Nasdaq प्रमुख घसरणीत तर S&P 500 व Dow Jones देखील धडाधड खाली आले. भारतावरही व्यापारी धोरणाचा थेट परिणाम होणार असल्याने आता सर्वांच्या नजरा फेडरल रिझर्व्हच्या पुढील निर्णयाकडे लागल्या आहेत.












