Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • लाईफस्टाईल
  • आरोग्यासाठी सुपरफूड ठरतो आवळा! आहारात समाविष्ट करण्याचे फायदे जाणून घ्या
ताज्या बातम्या

आरोग्यासाठी सुपरफूड ठरतो आवळा! आहारात समाविष्ट करण्याचे फायदे जाणून घ्या

Amla Benfits | आवळा (Amla) हे असं फळ जे आपल्या शरीरासाठी एकदम फायदेशीर आहे. कारण आवळा हा व्हिटॅमिन सी, फायबर, अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध आहे. त्यामुळे आवळ्याचा आपल्या आहारात समावेश करणे खूप प्रभावी ठरते. पण आवळा हा तुरट असल्यामुळे बरेच लोक तो खात नाहीत. पण वेगवेगळ्या पदार्थांमधून आवळ्याचा आपल्या आहारात समावेश करणे गरजेचे आहे.

हेही वाचा – वजन झपाट्याने कमी करायचंय? सकाळच्या नाश्त्यात ‘या’ प्रथिनेयुक्त पदार्थांचा समावेश करा आणि पहा प्रभावी परिणाम

आवळ्याचे नियमित सेवन केल्यामुळे आपली रोग प्रतिकारशक्ती मजबूत होते. तसेत ज्यांना शूगर, बीपीचा त्रास आहे अशा लोकांसाठी आवळा शरीरातील साखर नियंत्रित करण्यासाठी मदत करतो. तसेच आवळ्याचे दररोज सेवन केल्याने त्वचेचे, केसांचे आरोग्य देखील सुधारते आणि बाकी आजारांपासूनही आपला बचाव होते.

आवळा हा आपल्या शरीरातील कोलेस्टेरॉलची पातळी कमी करतो आणि आपले हृदय निरोगी ठेवतो. तसेच आवळ्यामध्ये पोटॅशियमही असते जे रक्तदाब नियंत्रित ठेवण्यात मदत करते. त्यामुळे आवळ्याचा आपल्या आहारात समावेश करणे खूप गरजेचे असते. तर आता आपण आवळा आपल्या आहारात कसा समाविष्ट करायचा याबाबत जाणून घेणार आहोत.

आवळा आपल्या आहारात कसा समाविष्ट करायचा?

1. आवळ्याचे सॅलड – बरेच लोक त्यांच्या दररोजच्या आहारात सॅलडचा समावेश करत असतात. तर याच सॅलडमध्ये तुम्ही आवळ्याचा समावेश करू शकता. यासाठी काकडी, टोमॅटो, कांदा, गाजर, बीट आणि आवळ्याचे छोटे काप करून यामध्ये चाट मसाला टाकून तुम्ही सॅलड बनवू शकता आणि याद्वारे तुम्ही आवळ्याचा तुमच्या आहारात सामवेश करू शकता. जर तुम्ही अशाप्रकारे दररोज आवळा खाल्ला तर तुमचे पोटाचे त्रास कमी होण्यास मदत होईल. आवळ्यामुळे पचन सुधारते आणि पित्ताचा त्रास कमी होतो.

2. आवळ्याचा मुरब्बा – भरपूर लोकांना आवळ्याचा मुरब्बा खायला खूप जास्त आवडतो. तर तुम्ही देखील आवळ्याचा  मुरब्बा दररोज खाऊ शकता. ज्यांना गोड खायला आवडतं असे लोक गोड आवळ्याता मुरब्बा खाऊ शकतात. यामुळे व्हिटॅमिन सी मिळण्यास मदत होते, तसेच आपल्या केसांचे आरोग्य सुधारते आणि  केस मजबूत राहण्यात मदत होते.

3. आवळ्याचा ज्यूस किंवा आवळा पावडर – आजकाल आवळा पावडर बाजारात सहस उपलब्ध होते. तर तुम्ही पाण्यात मध आणि आवळा पावडर टाकून ते पिऊ शकता. तसेच तुम्ही आवळ्याचा ज्यूस करून देखील पिऊ शकता. यामुळे तुमचा बीपी नियंत्रित राहण्यास मदत होते.

अशाप्रकारे तुम्ही तुमच्या दररोजच्या आहारात आवळ्याचा समावेश करू शकता. यामुळे तुम्हाला प्रभावी फायदे मिळण्यास मदत होते आणि तुमचे आरोग्य निरोगी राहण्यास मदत होते.

img

Prakash

Web Content Producer

प्रकाश हराळे हे परखड, निर्भीड आणि निःपक्षपाती पत्रकार आहेत. सध्या ते LS मराठी येथे 'डिजिटल कंटेंट प्रोड्युसर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हराळे यांना दैनिक राष्ट्रसंचार, एज्युवार्ता न्यूज पोर्टल वृत्तसंस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हे जवळपास ५ वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी पुण्यातील "मराठवाडा मित्र मंडळ" या नामांकित महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवीत्तर पदवीचे शिक्षण घेतलं आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखन आणि सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याची आवड आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts