अमरावती पोलीस आयुक्तालयाच्या वतीने अमली पदार्थविरोधात जनजागृतीसाठी सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले. पोलीस कवायत मैदानावरून सुरू झालेल्या या रॅलीत पोलिसांसह अनेक नागरिकांनी सहभाग घेतला. शहराच्या प्रमुख चौकातून जात, अमली पदार्थांच्या दुष्परिणामांबाबत जनजागृतीचा संदेश देण्यात आला.












