वाशिमच्या रिसोड तालुक्यात सायंकाळच्या सुमारास मुसळधार पाऊस झाला असून त्यामुळे या भागातील नदी-नाल्यांना मोठा पूर आला. दरम्यान, मेहकर–रिसोड मार्गावर मोठेगावजवळ पाणी साचल्याने वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली. तसेच रानात चरायला गेलेली अनेक जनावरे पुराच्या पाण्यामुळे दुसऱ्या बाजूस अडकली होती. मात्र नागरिकांनी धाडस दाखवत पुरात उतरून ती जनावरे सुखरूप बाहेर काढली.












