रत्नागिरीत तीर्थक्षेत्र गणपतीपुळे येथे पहाटे 3.30 वाजल्यापासून श्रींच्या दर्शनासाठी भाविकांच्या मोठ्या रांगा लागल्या आहेत. श्रावणात अनेक वर्षानंतर अंगारकी चतुर्थी जुळून आल्याने राज्यभरातुन अनेक भाविक येथे दाखल झाले आहे. भाविकांची गर्दी लक्षात घेता सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त आहे. श्रींचे दर्शन रात्री 10.30 पर्यंत भाविकांना खुले आहे.












