लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती आज छत्रपती संभाजीनगर शहरभरात मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. या पार्श्वभूमीवर टीव्ही सेंटर येथे आमदार प्रदीप जयस्वाल यांच्या उपस्थितीत अन्न आणि वस्त्र वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी मोठ्या प्रमाणात नागरिकांची उपस्थिती बघायला मिळाली तसेच माजी नगरसेवक राजू आहेरे यांच्या संकल्पनेतून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.












