Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • मनोरंजन
  • स्पीडचा थरार अन् अपघात! इन्स्टाग्रामवर लाईव्ह करत बिग बॉस स्पर्धकाने उचलले टोकाचे पाऊल
ताज्या बातम्या

स्पीडचा थरार अन् अपघात! इन्स्टाग्रामवर लाईव्ह करत बिग बॉस स्पर्धकाने उचलले टोकाचे पाऊल

Anurag Dobhal | ‘बिग बॉस 17’ (Bigg Boss 17) फेम आणि प्रसिद्ध युट्यूबर (Youtuber) अनुराग डोभाल (Anurag Dobhal) हा मागील काही दिवसांपासून चांगलाच चर्चेत आहे. कारण गेल्या काही दिवसांपासून तो डिप्रेशनमध्ये असल्याचं पहायला मिळालं होतं. त्याने आपल्या युट्यूब चॅनेलवर एक व्हिडीओ शेअर केला होता, ज्यामध्ये त्याने आपण डिप्रेशनमध्ये गेल्याचे सांगत त्यांच्या आई-वडीलांवर आणि भावावर गंभीर आरोप केले होते. तर अशातच आता त्याने इंन्स्टाग्रामवर लाईव्ह येत भरधाव वेगाने कार चालवत आत्महत्येचा प्रयत्न केला असल्याची माहिती समोर आली आहे.

हेही वाचा – सामान्यांना महागाईचा फटका, घरचा सिलेंडर 60 रु. तर व्यावसायिक 115 रुपयांनी महागला..

इन्स्टाग्रामवर लाईव्ह करत अनुराग डोभालचा आत्महत्येचा प्रयत्न

मिळालेल्या माहितीनुसार, अनुराग डोभालच्या कारचा भीषण अपघात झाला आहे. ज्या दिवशी ही घटना घडली त्यावेळी अनुराग इन्स्टाग्रामवर लाईव्ह करत होता. त्याने आपल्या कारमधून इन्स्टाग्राम लाईव्ह केले होते. यादरम्यान त्याने त्याच्या कारचा वेग खूप जास्त वाढवला होता. कारचा वेग 150 किमी प्रति तास इतक्यावर जाऊन पोहोचला होता. वाढत्या वेगामुळे मेरठ एक्सप्रेसवर अनुरागला कार अनियंत्रित झाली आणि ती थेट दुभाजकाला धडकली. हा भीषण अपघात अनुरागच्या चाहत्यांनी लाईव्ह पाहिला असून सध्या तो व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या घटनेनंतर अनुरागच्या चाहत्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. तर सध्या अनुरागला रूग्णालयात दाखल केले असून त्यांच्या उपचार सुरू आहेत.

रेकॉर्डींग शेअर करत अनुरागचे आई-वडीलांवर गंभीर आरोप

अनुरागने 4 मार्च रोजी त्याच्या युट्यूब चॅनेलवर एक व्हिडीओ शेअर केला होता. ज्यामध्ये त्याने त्याच्या आई-वडिलांवर, भावावर गंभीर आरोप केले आहेत. तसेच त्याने त्याच्यावर आलेला आर्थिक, माणसिक तणाव, कौटुंबिक वाद, लग्न, खासगी आयुष्य याबाबत सविस्तर खुलासा केला आहे. या व्हिडीओमध्ये अनुराग भावूक होत रडताना देखील दिसला. सोबतच त्याला त्याच्या कुटुंबियांकडून कसा मानसिक त्रास दिला जात आहे याचे काही रेकॉर्डिंगही अनुरागने शेअर केले आहेत. तसेच आपण मानसिक तणावातून जात असल्याचंही अनुरागने स्पष्ट केलं होतं.

अनुरागने शेअर केलेल्या व्हिडीओत म्हटलं आहे की, पुढच्या जन्मी मी जेव्हा येईन तेव्हा माझ्यावर फक्त प्रेम कर. मला तुझ्या प्रेमाची खूप गरज होती. मी आता कुणाला फोन करू, आत्ता माझ्यासोबत कुणीच नाहीये. तसेच लेट्स गो फॉर द फाइनल ड्राइव्ह असं म्हणत अनुरागने कार वेगाने पळवली आणि त्याचा अपघाता झाला. हा भीषण अपघात झाल्यानंतर अनुरागला काही स्थानिक गावकऱ्यांनी कारमधून बाहेर काढले आणि रूग्णालयात दाखल केले.

सध्या अनुरागला रूग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. तर पोलीस या अपघात प्रकरणाचा तपास करत आहेत. अनुरागने असे का केले? हा खरच अपघात होता की आत्महत्येचा प्रयत्न याबाबत पोलीस चौकशी करत आहेत.

दरम्यान, अनुराग डोभाल हा एक प्रसिद्ध युट्यूबर असून त्याला ‘UK07 रायडर’ या नावाने ओळखले जात. त्याचा चाहता वर्ग लाखोंच्या संख्येत आहे. तसेच तो ‘बिग बॉस 17’ पासून चांगलात प्रसिद्धीझोतात आला होता. अशातच आता अनुरागच्या अपघाताचा व्हिडीओ पाहून त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

img

Prakash

Web Content Producer

प्रकाश हराळे हे परखड, निर्भीड आणि निःपक्षपाती पत्रकार आहेत. सध्या ते LS मराठी येथे 'डिजिटल कंटेंट प्रोड्युसर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हराळे यांना दैनिक राष्ट्रसंचार, एज्युवार्ता न्यूज पोर्टल वृत्तसंस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हे जवळपास ५ वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी पुण्यातील "मराठवाडा मित्र मंडळ" या नामांकित महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवीत्तर पदवीचे शिक्षण घेतलं आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखन आणि सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याची आवड आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts