Arjun Tendulkar And Sania Chandok Marriage | क्रिकेट विश्वातील मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा (Sachin Tendulkar) मुलगा अर्जुन तेंडुलकर (Arjun Tendulkar) लग्नबंधनात अडकला आहे. अर्जुन तेंडुलकरने सानिया चंडोकसोबत (Saaniya Chandhok) लग्नगाठ बांधली आहे. अर्जुन-सानियाचा विवाहसोहळा एकदम थाटामाटत पार पडला. हा खास विवाहसोहळा मुंबईतील वरळी येथे पार पडला. तसेच या विवाहसोहळ्यात अनेक मोठ्या दिग्गजांनी हजेरी लावली होती.
हेही वाचा – क्रिकेट विश्वातील सर्वात मोठी बातमी, ओपनर खेळाडू संघातून बाहेर?
मुंबईतील वरळी येथील पंचतारांकित हॉटेमध्ये अर्जुन-सानियाचा विवाहसोहळा पार पडला. आज सकाळी पावणे बाराच्या सुमारास अर्जुन-सानिया यांनी लग्नगाठ बांधली. विशेष म्हणजे लग्नात अर्जुनने पारंपारिक पोशाख परिधान केला होता, ज्यात तो खूपच हँडसम दिसत होता. त्याने लाल रंगाची शेरवानी परिधान केली होती. तर सानियाने लाल रंगाची साडी नेसली होती. या साडीमध्ये सानिया एकदम सुंदर दिसत होती. तर विवाहप्रसंगी सचिन तेंडुलकर आणि अंजली तेंडुलकर अर्जुन आणि सानिया यांच्या बाजूला उभे होते. त्यावेळी सचिनच्या हातात फुलं होती तर अंजली यांच्या हातात दिवा असलेलं ताट होतं. अर्जुन-सानियाने एकमेकांना वरमाला घालताच त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करण्यात आला. एकमेकांना हार घातल्यानंतर अर्जुन-सानियाने आनंदाने एकमेकांना मिठी मारली. सध्या त्यांच्या या लग्नसोहळ्याचे खास फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.
Arjun Tendulkar, the son of Sachin Tendulkar, got married to Saaniya Chandhok today in Mumbai.❤️
Congratulations to Arjun and Saaniya. Best wishes for a happy life together. 💐 pic.twitter.com/HhkU9is64F
— 𝐑𝐮𝐬𝐡𝐢𝐢𝐢⁴⁵ (@rushiii_12) March 5, 2026
अर्जुन आणि सानियाच्या लग्नसोहळ्याला अनेक दिग्गजांनी हजेरी लावली होती. यामध्ये ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन, जया बच्चन, शाहरूख खान, फरहान अख्तर, शंकर महादेवन, ऐश्वर्या राय अशा अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. तर सुप्रिया सुळे, राज ठाकरे या नेतेमंडळींसह अनिल कुंबळे, युवराज सिंह, महेंद्रसिंह धोनी, श्रेयस अय्यर, अजिंक्य रहाणे, झहीर खान, इरफान पटाण, हरभजन सिंग अशा अनेक खेळाडूंनी हजेरी लावली होती. सोबतच भारतातील दिग्गज उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या कुटुंबीयांनीही या विवाह सोहळ्याला हजेरी लावली होती.
दरम्यान, मागील काही दिवसांपासून अर्जुन आणि सानियाच्या लग्नाच्या विधींना सुरूवात झाली होती. यामध्ये मेहंदी समारंभ आणि हळदी समारंभ मोठ्या थाटात पार पडला होता. या सोहळ्यांचे खास फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. तर आता अर्जुन-सानिया लग्नबंधनात अडकले असून त्यांच्यावर नेटकऱ्यांनी शुभेच्छांचा मोठ्या प्रमाणात वर्षाव केला आहे.






