सांगलीच्या शिराळा तालुक्यातील माळेवाडी गावात अश्विनी गोसावी या महिलेने दाखवलेल्या धाडसामुळे गावावरचे मोठे संकट टळले. घरात दबा धरून बसलेल्या बिबट्याला त्यांनी तात्काळ दरवाज्यात कोंडून ठेवले आणि घरच्यांना माहिती दिली. ग्रामस्थांच्या मदतीने पोलिस व वनविभागाला कळवण्यात आले. वनपाल अनिल वाजे यांच्या मार्गदर्शनाखाली रेस्क्यू टीम, प्राणीमित्र व ग्रामस्थांनी संयुक्त कारवाई करून बिबट्याला सुरक्षित जेरबंद केले. त्यानंतर त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. अश्विनींच्या प्रसंगावधानाचे व गावकऱ्यांच्या सहकार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.












