जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण जगभरात खळबळ उडवली आहे. या घटनेत 28 जणांची हत्या करण्यात आली आणि 20 पेक्षा जास्त जण जखमी झाले. या थरकाप उडवणाऱ्या हल्ल्यामुळे काश्मीरमधील सुरक्षा परिस्थितीवर चिंता व्यक्त केली जात आहे. अनेक लोक काश्मीरला जाण्याच्या बाबतीत घाबरत असताना, मराठी अभिनेता अतुल कुलकर्णीने एक पोस्ट शेअर करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. अतुल कुलकर्णीने X (पूर्वी ट्विटर) वर एक पोस्ट शेअर केली असून त्यात त्याने विमानाच्या तिकिटांचा फोटो सामायिक केला आहे. या पोस्टला त्याने कॅप्शन दिले, “मुंबई ते श्रीनगर, काश्मीर.” याचा अर्थ, दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरला जाण्याबाबत लोकांमध्ये भीती असताना, अतुल कुलकर्णीने काश्मीरला जाण्याचा निर्णय घेतला आहे. अतुलची ही पोस्ट संपूर्ण सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे. त्याच्या या निर्णयामुळे तो दहशतवादाला कसा प्रतिकार करत आहे, हे स्पष्ट दिसून येत आहे. या पोस्टने संपूर्ण महाराष्ट्रातच नाही तर देशभरात एक सकारात्मक संदेश दिला आहे.












