बुलढाण्यातील जिल्हा परिषदेच्या सभागृहात बच्चू कडू यांच्या नेतृत्वातील शेतकरी-शेतमजूर हक्क यात्रा दाखल झाली. या यात्रेत दिव्यांग शेतकरी, मेंढपाळांचा सहभाग होता. मेळाव्यात कर्जमाफीसह शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी विचारमंथन झाले. यात्रेचा शुभारंभ वाशिम जिल्ह्यातून झाला असून, बच्चू कडू रोज प्रत्येक जिल्ह्यात ५–६ सभा घेत आहेत. २८ ऑक्टोबरला ही यात्रा मुंबईकडे कूच करणार असल्याचे त्यांनी सांगितले.












