जळगावमध्ये बालरंगभूमी परिषदेतर्फे मराठी बालनाट्य दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळी रंगमंच पूजनानंतर जळगाव शहरातून बालनाट्य दिंडी काढण्यात आली. पारंपारिक वेशभूषेत लेझीम नृत्य सादर करत विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले. छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहापासून दिंडी सुरु होऊन काव्यरत्नावली चौक येथे समारोप झाला. यावेळी सहभागी शाळांना स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.












