मराठा आरक्षणासाठी मुंबईतील आझाद मैदानावर मनोज जरांगे यांचे बेमुदत उपोषण सुरू असून राज्यभरातून लाखो मराठा बांधव दाखल झाले आहेत. आंदोलकांची गैरसोय होऊ नये म्हणून बारामतीतील मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने 5000 भाकरी, 1000 बॉक्स बिसलेरी, बिस्किट पुडे व इतर साहित्य मुंबईला रवाना करण्यात आले. उपोषण सुरू असेपर्यंत अशी मदत पाठवत राहण्याचा विश्वास मराठा बांधवांनी दिला आहे.












