बीडच्या परळी जवळील नाथरा फाटा येथे हॉटेलसमोर एका तरुणांकडून भगवे कपडे घातलेल्या व्यक्तीला मारहाण होत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. मारहाण करणारा तरुण या व्यक्तीला शिवीगाळ करत, “येथे कुठे पोलीस येणार आहेत?” असा जाब विचारताना दिसतो. दरम्यान, या व्हिडिओ प्रकरणी अद्याप पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला नाही.












