गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुका मुसळधार पावसाने पूर्णतः विस्कळीत झाला आहे. छत्तीसगडमध्ये झालेल्या दमदार पावसामुळे इंद्रावती नदीसह पामुलगौतम आणि पर्लकोटा नद्या तुडुंब भरल्या असून पर्लकोटा नदीचा पूल 15 ते 20 फूट पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे भामरागड तालुका मुख्यालय जलमय झाले असून तालुक्यातील 100 पेक्षा अधिक गावांचा जिल्हा मुख्यालयाशी संपर्क पूर्णपणे तुटला आहे.












