भंडाऱ्यात जुन्या वैमनस्यातून धारदार शस्त्राने हल्ला करून वसीम उर्फ टिंकू खान आणि शशांक गजभिये यांची निर्घृण हत्या करण्यात आली. घटनेनंतर फरार झालेल्या चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यात भंडाऱ्यातील दोन सख्ख्या भावांसह नागपूरच्या दोघांचा समावेश आहे. हत्येनंतर शहरात तणाव निर्माण झाला होता, मात्र पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली.












