अहिल्यनगर जिल्ह्यातील भंडारदरा धरण ओव्हरफ्लो झाले आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या दोन दिवसांपासून धुवांधार पाऊस कोसळत आहे. या मुसळधार पावसामुळे धरणाचा पाणीसाठा ९८ टक्क्यांवर पोहोचला आहे, ज्यामुळे धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. भंडारदरा धरण ओव्हरफ्लो झाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. याचबरोबर, रंधा धबधबा देखील ओसंडून वाहत आहे. धबधब्याजवळ पाण्याने धारण केलेले रौद्ररूप डोळ्यांचे पारणे फेडणारे ठरले आहे.