भिवंडी तालुक्यातील खार्डी येथे दोन जणांची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मृतांची नावे प्रफुल्ल तांगडी आणि तेजस तांगडी असून यातल्या प्रफुल्ल तांगडी यांच्यावर एका वर्षांपूर्वीही हल्ला झाला होता. प्रफुल्ल तांगडी हे भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष म्हणून कार्यरत होते. पोलिसांना चार हल्लेखोर असल्याची प्राथमिक माहिती मिळाली असून पुढील तपास सुरु आहे.












