गणेशोत्सवासाठी कोकणाकडे २१ बसेस पाठवल्यामुळे भुसावळ आगारातील ३४ फेऱ्या रद्द करण्यात आल्या. यामुळे नाशिक, मेहकर, धुळे, नागपूर, जळगाव आणि संभाजीनगरसारख्या लांब पल्ल्याच्या प्रवाशांची गैरसोय होणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर आगाराने उपलब्ध २७ बसेसवर पुढील पंधरा दिवसांचे नियोजन केले असून प्रवाशांना महामंडळाला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.












