चंद्रपूर-गडचिरोली महामार्गावर भीषण अपघात घडला असून तो सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. महामार्गावरील गाईला दुचाकीस्वाराने जोरदार धडक दिल्याने दोघे गंभीर जखमी झाले. अपघाताचे थरारक फुटेज सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.












