सोलापूर शहरात रविवारी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास शॉक लागून दोघांचा मृत्यू झाला होता.सायंकाळी उशिरापर्यंत पोस्टमार्टमची प्रक्रिया संपन्न झाली. मृतदेह ताब्यात घेताना नातेवाईकांनी नुकसान भरपाईची मागणी केली होती. मृत्यूस कारणीभूत असलेल्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली होती. मात्र गुन्हा दाखल किंवा मृतांच्या वारसास नुकसान भरपाई मिळत नसल्याने अखेर रविवारी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास अंत्ययात्रा थेट एमआयडीसी पोलीस ठाण्यात आणली. चंद्र शेखर दोंतुलु या तरुणाच्या मृतदेहावर अंतिम संस्कार करण्याऐवजी अंत्ययात्रेचे वाहन थेट पोलीस ठाण्यात आणल्याने पोलीसही काही वेळ गोंधळून गेले होते. पोलीस प्रशासनाने अशा नाजूक परिस्थितीत अतिशय संयम ठेवून मृतांच्या नातेवाईकांची समजूत घालत , मृत्यूस कारणीभूत असलेल्यावर कठोर कारवाई करणार असा शब्द दिला.












