Bone Marrow Health: आजकालच्या धावपळीच्या जीवनशैलीत अनेकांना आरोग्याच्या समस्या जाणवत आहेत. जर तुम्हीही तुमच्या दैनंदिन दिनचर्येत खाली दिलेल्या सवयींचा समावेश करत असाल, तर तुमचा बोन मॅरो धोक्यात येऊ शकतो. कसे ते जाणून घेऊया
आपल्या शरीरातील हांडांच्या आत असलेली अस्थिमज्जा (बोन मॅरो) ही एक अत्यंत महत्वाची रचना आहे. शरीरातील रक्स्तनिर्मितीची संपूर्ण जबाबदारी याच्यावर असते. त्यामुळे ती निरोगी राहणे खूप गरजेचे आहे.
हेही वाचा: डिटॉक्सच्या नावाखाली Water Fasting करणे धोकादायक; तज्ज्ञांनी सांगितले कारण अन् उपाय
बोन मॅरोमध्ये असलेल्या विशेष स्टेम सेल्समुळे रक्तातील तीन महत्वाचे घटक तयार होतात. लाल रक्तपेशी, पांढऱ्या रक्तपेशी आणि प्लेटलेट्स. हे तिन्ही घटक शरीराचे कार्य सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक असतात.
बोन मॅरोची मुख्य कार्ये काय आहेत?
रेड ब्लड सेल्स (RBCs) तयार करणे
हे शरीरात ऑक्सिजन पोहोचवतात. यांची कमतरता असल्यास थकवा, अशक्तपणा आणि अॅनिमिया होतो.
व्हाइट ब्लड सेल्स (WBCs)
हे शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढवतात आणि संसर्ग, बॅक्टेरिया व व्हायरसशी लढतात.
प्लेटलेट्स तयार करणे
जखम झाल्यावर रक्त गोठवण्यासाठी मदत करतात. प्लेटलेट्स कमी झाल्यास जास्त रक्तस्त्राव होऊ शकतो.
या मुख्य सवयी टाळा
धूम्रपान आणि तंबाखूचे सेवन
त्यातील विषारी घटकांमुळे रक्तनिर्मितीत अडथळा येतो आणि पेशींची संख्या कमी होते.
मद्यपान
मद्य शरीरातील ऑक्सिजनची पातळी वाढवते आणि रक्त तयार होण्याची प्रक्रिया मंदावते.
घातक रसायनांचा संपर्क
कीटकनाशके किंवा औद्योगिक रसायनांमुळे अस्थिमज्जेचे नुकसान होऊ शकते.
अपूर्ण आहार
लोह, कॅल्शियम आणि जीवनसत्त्वांची कमतरता असल्यास अस्थिमज्जा (बोन मॅरो) कमकुवत होते.
संसर्गजन्य रोग
हिपॅटायटीस आणि एचआयव्ही सारख्या आजारांमुळे अस्थिमज्जेचे नुकसान होऊ शकते.
औषधांचा अति वापर
डॉक्टरांचा सल्ला न घेता औषधे किंवा स्टिरॉइड्स घेणे धोकादायक ठरू शकते.
निरोगी ठेवण्यासाठी काय करावे?
संतुलित आणि पौष्टिक आहार घ्या
धूम्रपान आणि मद्यपान टाळा
नियमित व्यायाम करा
स्वच्छता राखा











