पुण्यातील बाणेरमध्ये ब्रेकअप झाल्याच्या रागातून एका तरुणाने आपल्या 24 वर्षीय प्रेयसीवर पिस्तुलातून गोळीबार करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. मात्र पिस्तुल लॉक झाल्याने गोळीझाडली गेली नाही. आरोपी पसार झाला असून त्याची पोलिसांकडून शोधाशोध सुरू आहे.












