बीड जिल्ह्याच्या परळी तालुक्यातील सिरसाळा परिसरात भीमराव शिवाजी राठोड या तरुणाची प्रेम प्रकरणातून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अनिल चव्हाण याने भीमरावच्या डोक्यात कोयत्याने वार करून त्याची हत्या केली. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या भीमरावचा जागीच मृत्यू झाला आहे. या प्रकरणी सिरसाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.












