चंद्रपूरच्या भद्रावती पंचायत समिती कार्यालयात एका कर्मचाऱ्याचा संगणकावर पत्ते खेळतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. कार्यालयीन वेळेत आणि शासकीय संगणकावर असे वर्तन उघडकीस आल्यानंतर प्रशासनाच्या कारभारावर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. एका युवकाने हा प्रकार मोबाईलमध्ये टिपून व्हिडिओ शेअर केला. नागरिकांनी संताप व्यक्त करत संबंधित कर्मचाऱ्यावर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे. सरकारी कार्यालयांमध्ये अशा हलगर्जीपणामुळे कामकाजाची विश्वासार्हता ढासळत असल्याची तीव्र भावना व्यक्त होत आहे.












