Chandigarh Administration’s New Excise Policy : आखाती देशातील युद्धामुळे (iran-israiel-america war) अनेक पेट्रोल पंप (petrol pump) कोरडे ठाक पडले आहेत. त्यामुळे वाहनधारकांचे मोठे वांदे झाले आहेत. त्यांना पेट्रोल मिळणे मुश्किल बनले आहे. अशातच चंदीगड प्रशासनाने नवीन अबकारी धोरण (Chandigarh Administration’s New Excise Polic जारी केले आहे. या अबकारी धोरणात आता चंदीगड प्रशासनाने दारूच्या दुकानांमध्येच नाही तर पेट्रोल पंप (petrol pump), शॉपिंग मॉल्स (shopping malls) आणि स्थानिक बाजारपेठांमध्ये दारूची विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे. एवढंच नाही तर मोठ्या डिपार्टमेंटल स्टोअर्सनादेखील (Departmental stores) विदेशी दारू, वाईन आणि बिअर विकण्याची परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता पेट्रोल पंपावर चिअर्सSsss…चा आवाज घुमला तर आश्चर्य वाटण्याचे कारण नाही.
हे ही वाचा: जहाजांकडून टोल वसूल; इराणच्या विधेयकावर भारतावर काय परिणाम होणार?
दारू विक्रीचे नियम अधिक शिथिल
चंदीगड प्रशासनाने आपले नवीन अबकारी धोरण जारी केले आहेत. दारू विक्रीचे नियम अधिक शिथिल केले आहेत. आता केवळ जुन्या दारूच्या ठेक्यांवरच नाही, तर पेट्रोल पंप, शॉपिंग मॉल्स आणि स्थानिक बाजारपेठांमध्येही दारूची दुकाने उघडण्यास मंजुरी देण्यात आली आहे.
97 दारूच्या दुकानांना परवानगी
नवीन धोरणानुसार शहरात एकूण 97 दारूच्या दुकानांना परवानगी देण्यात आली आहे. तसेच प्रत्येक दारूच्या दुकानात डिजिटल पेमेंट अनिवार्य करण्यात आले आहे. यामुळे रोखीच्या व्यवहारांऐवजी पारदर्शकता वाढेल.
‘अल्कोहल मीटर’ लावणे बंधनकारक
नवीन अबकारी धोरणानुसार, बार, हॉटेल आणि रेस्टॉरंट्समध्ये ‘अल्कोहल मीटर’ लावणे बंधनकारक असेल. जेणेकरून ग्राहक जबाबदारीने मद्यपान करू शकतील. तसेच दारूची वाहतूक करणाऱ्या सर्व गाड्यांना जीपीएस ट्रॅकिंग लावणे अनिवार्य असेल. यासह सर्व दुकानांवर सीसीटीव्ही आणि लाईव्ह मॉनिटरिंगच्या माध्यमातून प्रशासनाची कडक नजर असेल.










