उजनी आणि वीर धरणातून भीमा नदी पात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे पंढरपुरातील चंद्रभागा नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. आज सकाळी पंढरपुरातील चंद्रभागा नदीमध्ये 22 हजाराहून अधिक क्युसेक इतका विसर्ग सुरू आहे. चंद्रभागा नदीपात्रातील भक्त पुंडलिक मंदिरासह इतर साधुसंतांच्या समाधीना पाण्याने वेढा दिला आहे. आज सायंकाळपर्यंत पंढरपुरात पाण्याची पातळी आणखी वाढण्याची शक्यता आहे.












