पोलिसांनी दोन महिन्यांच्या बाळाचा वापर करून ड्रग्ज तस्करी करणाऱ्या मुंबईच्या दोन महिलांसह 5 जणांना अटक केली. या कारवाईत 400 ग्रॅम एमडी ड्रग्ज, एक पिस्तूल आणि एकूण 16 लाखांचा मुद्देमाल जप्त झाला. पोलिसांना चकवण्यासाठी बाळाला सोबत नेण्याची शक्कल वापरली होती. न्यायालयाने आरोपींना 11 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून तपास सुरू आहे.












