उत्तरकाशीतील धराली गावात ढगफुटीमुळे मातीचा लोंढा घरावर आणि हॉटेलवर वाहून आल्याची घटना घडली आहे. मोठ्या प्रमाणात चारधामचे भाविक अडकल्याची शक्यता आहे. उत्तरकाशीत खीर गंगेच्या रौद्ररुपामुळे अनेक घरं पुरात वाहून गेली असून काही मातीच्या ढिगाऱ्याखाली पुरली गेली आहेत. मदतकार्यासाठी SDRF व NDRF पथकं घटना स्थळी रवाना झाली असून बचावकार्य सुरु आहे. यामध्ये 10 ते 12 कामगार ढिगाऱ्याखाली अडकल्याची माहिती समोर आली आहे. तसेच 4 जणांचा मृत्यू झाला असून मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. उत्तराखंडात पावसाने हाहाकार माजवला आहे.












